कोरोना नियमांचे उल्लंघन ; जळगावातील ८ दुकानांवर सीलबंद कारवाई

0

जळगाव प्रतिनिधी । कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुभाष चौक, दाणाबाजार परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळात इतर दुकाने लपून छपून व्यवसाय करणाऱ्या आज ८ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून सीलबंद केले.

सविस्तर असे की, जळगाव शहरात कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या पर्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे कडक सुचना देण्यात आले आहे. असे असतांना जळगाव शहरात काही ठिकाणी अनेक दुकानदार शटर बंद ठेवून आत व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत पथकाने आज बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलनपेठेतील गृहसंसार प्रोव्हीजन, बाबा हरदास ट्रेडर्स, दाणाबाजारातील मे. विजयकुमार रामदास, बिरदीचंद धनराज बरडीया, किर्ती ट्रेडर्स, महाराष्ट्र टुल्स ॲण्ड हार्डवेअर बोहरा गल्ली, अमृतकर किराणा, आणि अमित ट्रडींग कंपनी या ८ दुकानांवर दंडात्मक कारवाई करत सीलबंद कारवाई केली.

ही कारवाई उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मागर्दर्शनाखाली अतिक्रमण विभागातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे, सलमान भिस्ती व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.