कोरोना इफेक्ट ! शेयर बाजारात मोठी घसरण

0

मुंबई | कोरोनाने जगभरात थेमान घातले आहे. युरोपात कोरोने लाखो लोकं आजारी पडले आहेत. जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे १४००० जणांचा मृत्यू झाला आहे. आता याचा फटका शेयर बाजारालाही बसताना दिसत आहे. मुंबई शेयर बाजारात आज सेन्सेक्स तब्बल २६०० अकांनी घसरला आहे.

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था ढासळली आहे. याचा फटका आता देशातील अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे. आज मुंबईतील स्टाॅक मार्केटमध्ये सेन्सेक्सची जोरदार घसरण पहायला मिळाली. आज सकाळीच सेन्सेक्स २६०० अकांनी घसरला. तसेच निफ्टी ८०० अंकांनी घसरली. सध्या सेन्सेक्स २७००० वर पोहोचला आहे तर निफ्टी निफ्टी ६२५ वर पोहोचली आहे.

दरम्यान, कोरोनाने आता भारतातही पाय पसरले आहेत. देशात आत्तापर्यंत एकुण ३९२ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांना आकडा ८९ वर पोहोचला आहे. घरातून बाहेर पडू नका, स्वत: ला वाचवा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.