कोरोनामुळे हातावर पोट भरणाऱ्यांची होतेय उपासमार

0

चोपडा | प्रतिनिधी राकेश पाटील

समाजातील सर्वच घटकांना आता कोरोनाचा फटका बसू लागला आहे.तरी कोरोनामुळे सर्वाधिक दयनीय अवस्था झालेली दिसून येते ती म्हणजे राज्यातील शेतमजूर,छोट्या मोठ्या व्यवसायातील रोजंदारी मजूर कामगार ,हमाल,माथाडी कामगार,छोटे उद्योग व्यावसायिक त्यातून रोजगार मिळवणारे कामगार , बँड चालवणारे व्यावसायिक, बालकामगार, घरकामगार, या क्षेत्रातील असंघटिक वर्गाची ‘कमवा आणि खा ‘ या वर्गात मोडणाऱ्या आणि हातावरच पोट असलेल्या या लोकांवर कोरोनामुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

आपल्या चोपडा तालुक्यात हजारो शेतमजूर आहेत.आणि सद्या पडणाऱ्या उन्हामुळे शेतीची कामे कमी झालेली आहेत.आणि आता मात्र कोरोनाच्या भीतीने आजची कामे उद्यावर ढकलणे सुरू आहे.ऊस तोडणी कामे शेवटच्या टप्प्यात आहेत.आता शिवरातून नजर फिरवली तर जाणवते की जणू शुकशुकाट झाला आहे.गहू पीक पंजाब मधून आणलेल्या मशीन च्या साह्याने काढला जातो आहे. हरभरा कापणीचे तुरळक असे कामे शिल्लक आहेत.

तालुक्यात बांधकाम मजूर आहेत त्यांची संख्या काही हजारात येईल त्याच्या व्यवसायात आधीच अभुतपुर्व मंदी सुरू आहे त्यातल्या त्यात वाळूचे ठेके गेलेले नाहीत त्यामुळे ते मिळेल त्या भावात काम सुरू होते.पण सद्या चे चित्र असे आहे की बांधकाम क्षेत्रात कोरोना मुळे जे प्रकल्प सुरू होते ते आता बंद पडले आहेत.त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे.

तालुक्यात घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या (खासकरून शहरात) मोठी आहे. मिळेल ती रोख रक्कम व उरले सुरले अन्न हेच या वर्गाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.पण सद्या कोरोनाच्या संपर्काच्या धास्तीने अनेक घरातील घरकामगारांचा त्या त्या घरातील प्रवेश बंद झाला आहे.

तालुक्यात किरकोळ उद्योग व्यावसायिक उद्योजक आहे यामध्ये छोटी हॉटेल,चहाच्या गाड्या, पान टपऱ्या ,खाद्यपदार्थची गाडे,निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू विक्रेते,धाबे ,पंक्चर काढणारे,सायकल ,मोटर सायकल दुरुस्ती करणारे, शीतपेय विक्रेते , वेफर्स विक्रेते,मिठाई वाले,लॉटरी विक्रेते अशा सारखे शेकडो व्यवसाय करणारे यांचा यात समावेश होतो.आजकाल कोरोनामुळे एकामागून एक शहरे लॉक डाऊन ,कारखाने शटरडाऊन होत असल्याने चलनचालती प्रचंड प्रमाणात मंदावल्यामुळे यांचा व्यवसाय मोडून पडला आहे.या वर्गाची अवस्था थोड्याफार प्रमाणात अशी आहे की ‘ताजा लाना ताजा खाना’ किंवा ‘आज कमायेंगे तो  खाएंगे नही तो भूखे पेट ही सो जाएंगे’ अशी अवस्था असल्यामुळे या लोकांच्या वाट्याला हलाखीचे दिवस आलेले दिसत आहेत.

तालुक्यात प्रत्येक गावात दोन या प्रमाणे बँड पार्टी आहेत त्यांचा महत्वाचा सीजन म्हणजे मार्च ,एप्रिल आणि मे महिना. बँड मालकांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वाजवणाऱ्या कारागिरांना लाखो रुपये डिसेंबर महिन्यातच देऊन टाकले आहेत त्यांनी सीजन मध्ये साथ सोडू नये म्हणून पण यंदा कोरोनामुळे काही कमवता तर आले नाही पण बँड चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे. जी लग्न होती ती  बँड विनाच लावली गेली .त्यामुळे बँड वादकांचा व्यवसाय यंदा बुडल्यातच जमा आहे.एप्रिल महिन्यात लॉक डाऊन संपले तर ठीक तर बँड वाल्यांचा लाखो रुपयांचा व्यवसाय बुडल्यातच जमा आहे.रोजंदारीची कामे करणाऱ्या शेकडो हजारो काम करणाऱ्या कामगारांवर रोजी आणि रोटी बंद झाल्याची आफत ओढवलेली दिसत आहे.एकूणच काय तर हतावरची पोट असलेल्या लोकांच्या पोटावरच कोरोनाने आघात करायला आता सुरवात केली आहे.

तालुक्यात अनेक भिकारी आहेत. त्याची माहिती तालुक्यात कुणाकडेच मिळत नाही त्यांची भीक मागण्याची मुख्य ठिकाणे मंदिर मजीद धार्मिक आणि सार्वजनिक स्थळे आहेत मात्र कोरोनाने देव देवतांना कोंडून ठेवण्याची वेळ आल्यामुळे भिकारी देखील भयभीत झाले आहेत दुसरीकडे कुठे पाहिलं तर सगळीकडे शुकशुकाट त्यामुळे बिचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.कायद्याने बालमजुरी बंद आहे पण हॉटेल ,चहाची टपरी येथे काम करणाऱ्या त्या लहान मुलावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस मनोरुणाचा प्रश्न निर्माण होतो कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असती पण तो प्रश्न शहरातील अमर संस्थेने तो सोडवला आहे.शहरात जेवढे बेवारस मनोरुग्ण होते त्यांना अमर संस्थेने आपल्या मानव सेवा तीर्थ येथे त्यांच्या राहण्याची ,जेवणाची व औषधाची व्यवस्था अमर संस्थेने केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.