कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहातील अस्वच्छताबाबत महापौरांनी घेतली बैठक

0

जळगाव । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहातील अस्वच्छताबाबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांनी बोलावली होती. यावेळी शहरातील अस्वच्छता दूर करून औषधींची फवारणी योग्य प्रमाणात करण्यासाठी मलेरिया विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या.यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, आरोग्य पर्यवेक्षक सुधीर सोनवाल यांच्यासह मलेरिया विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

महापौर भारती सोनवणे यांनी मलेरिया विभागाची सद्यस्थिती व शहरासाठी आवश्यक बाबी याची माहिती सुरुवातीला जाणून घेतली. मलेरिया विभागात मनपाचे ४० कर्मचारी असून सरासरी दररोज २८ कर्मचारी कामावर असतात. त्यांच्यामार्फत फवारणी, धुरळणी, अबेटिंग करण्यात येते. शहरात अंदाजे १ लाख २० हजार घरे असून एक कर्मचारी १०० घरांचे सर्व्हेक्षण करतो. दररोज १०० याप्रमाणे आठवड्यात सरासरी ६०० घरांचे सर्व्हेक्षण होते अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मलेरिया विभाग शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विभाग आहे. मनपा आणि जळगावकरांचे हित लक्षात घेऊन काम करणाऱ्यांच्या आम्ही नेहमी पाठीशी आहोत परंतु काम चुकारपणा करणाऱ्यांची आम्ही गय करणार नाही असा इशारा देखील महापौर भारती सोनवणे यांनी दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.