कोटा येथे अखिल भारतीय श्री वैश्य चित्तोडा समाज युवक युवती परिचय संमेलन, गुणगौरवांचा सन्मान

0

कोटा येथे अखिल भारतीय श्री वैश्य चित्तोडा समाज युवक युवती परिचय संमेलन आणि वरीष्ठ नागरीक व विद्यार्थी गुणगौन समारंभात प्रा. डाँ उमेश वाणी यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दि. २९ डिसेंबर २०१९ रोजी कोटा (राजस्थान) येथे श्री वैश्य चित्तोडा महासभा, राजस्थान आयोजित अखिल भारतीय श्री वैश्य चित्तोडा समाजाचे युवक युवती परीचय संमेलन, वरीष्ठ नागरीकांचा सन्मान आणि विशेष गुणगौरव प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवप्रसाद चित्तोडा (अध्यक्ष, महासभा राजस्थान) यांनी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री डॉ एन के गुप्ता (सिनिअर फिजिशियन) यांचे गळ्यात फुलमाळा, माल्यार्पण दुपट्टा, साफा (राजस्थानी फेटा) घालून स्वागत करण्यात आले.
श्री शिवप्रसाद चित्तोडा यांचे कार्यक्रमाचे संयोजक श्री विनोदकुमार गुप्ता यांनी, श्री विनोदकुमार गुप्ता (संयोजक) यांचे सुमित चित्तोडा (सीए, महासभा) यांनी, राजेद्र महाजन (अध्यक्ष, नागर चित्तोडा समाज पंच मंडळ, इंदौर) यांचे स्वागत अँड कैलाशचंद गुप्ता (सेक्रेटरी महासभा) आणि नरेशकुमार मुकादम (कोटा, सदस्य महासभा) यांनी केले. सुरेशचंद्रजी पद्मावत (अध्यक्ष, दिंगबर जैन चित्तोडा पंचायत, उदयपूर) यांचे स्वागत कैन्हैयालाल चित्तोडा (बारा, सदस्य महासभा) आणि हेमंतकुमार (बिजौलिया, सदस्य महासभा) यांनी स्वागत केले. उमेश वाणी(अध्यक्ष, चितोडे वाणी समाज, जळगांव शहर) यांचे स्वागत गिरधर गोपाल चित्तोडा(बून्दी, सदस्य महासभा) आणि मुकेश चित्तोडा (नमाना, कोषाध्यक्ष महासभा) यांनी स्वागत केले. सुर्यप्रकाश चित्तोडा (वरीष्ठ एनीस्थीसिया विशेषज्ञ, प्रमुख अतिथी) यांचे स्वागत डाँ बद्रीलाल गुप्ता (बराणा, सदस्य महासभा) आणि अनिलकुमार चित्तोडा (नमाना, सदस्य महासभा) यांनी स्वागत केले. डाँ राकेश चित्तोडा (ह्रदयरोग तज्ञ, जयपूर, प्रमुख अतिथी) यांचे स्वागत मनिष मुकादम (कोटा, सहमंत्री महासभा) आणि पवनकुमार चित्तोडा (बरुंधन, सदस्य महासभा) यांनी स्वागत केले. सत्यनारायण गुप्ता (बरूंधन वाले, कोटा) यांचे स्वागत राजेशकुमार गुप्ता (लक्ष्मीपुरा, सदस्य महासभा) आणि राकेशकुमार चित्तोडा (जखाना, सदस्य महासभा) यांनी स्वागत केले. श्रीमती कल्पना गुप्ता (अध्यक्ष, महिला मंडळ कोटा) यांचे स्वागत अंतिमा चित्तोडा (बरूधंन) आणि शांता चित्तोडा यांनी केले. श्रीमती कमलेश चित्तोडा (अध्यक्ष, महिला मंडळ, बिजौलिया,) यांचे स्वागत सरीता चित्तोडा (नमाना) आणि आभा चित्तोडा (कोटा) यांनी केले. सर्वाचे स्वागत माल्यार्पण, दुपट्टा आणि फेटा घालून करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संमेलनाचा उद्देश, अपेक्षा आणि कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणानंतर ११५ युवक युवतींनी स्वतःचा परीचय आईवडिलांसमवेत करून दिला.
समाजातील दहावी,बारावी, पदवी,पदविका, क्रीडा व विशेष प्राप्त विद्यार्थी व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यानंतर विविध २१ गांवाचे अध्यक्ष व कार्यकारणीचा (कोटा, बून्दी, गरडदा,जयपूर, बिजौलिया, गेणोली, नमाना, केशवराय पाटण, नीम का खेडा, जलोदा, जखाना छरकवाडा, झाली जी का बराणा, उलेडा, लक्ष्मीपूरा, बरूंधन, बांरा, अन्ता, भीलवाडा, काप्रेन, मंडाना, मांदलिया) ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी राजेंद्र महाजन, इंदौर प्रमुख अतिथी सुरेशचंन्द पद्मावत,उदयपूर, प्रमुख अतिथी उमेश वाणी, जळगांव. इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा डाँ उमेश वाणी यांनी आपल्या मनोगतात संमेलन आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करून संपूर्ण भारतातील चित्तोडा समाजाची जनगणना झाली पाहिजे यासाठी देशपातळीवर एक वेबसाईट विकसित करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजराथ येथील समाजाचे दरवर्षी एक संमेलन आयोजित करुन रोटी बेटी व्यवहार करण्यास चालना द्यायला हवी जेणेकरून प्रत्येकाचे संस्कार, रीती रीवाज, चालीरीती, सणसनावळ माहित होतील. मुख्य अतिथी डाँ एन के गुप्ता यांनी धन्यवादपर भाषण केले तर धन्यवादपर अध्यक्षीय भाषण शिवप्रसाद चित्तोडा यांनी करून चित्तोडा समाजाच्या वेबसाईटचे अनावरण करून कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेशकुमार चित्तोडा, बिजौलिया, सीए सुमित चित्तोडा, कोटा, आरती मेहता, भोपाल यांनी केले तर आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक विनोदकुमार गुप्ता यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी झी न्यूज, ई टिव्ही राजस्थान, राजस्थान पत्रिका, दै भास्कर आणि स्थानिक वर्तमान पत्राचे प्रतिनिधी यांचेही उपस्थिती निमित्त स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.