कै. धनशिंग पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त ५१ वारकऱ्यांची आमदार किशोर पाटील यांचे तर्फे पंढरीची वारी

0

पाचोरा – पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे वडील धनशिंग ओंकार पाटील २ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले होते, त्यांनी आयुष्यात सतत ५१ वेळा पंढरपूरला पायी चालत वाऱ्या केल्या होत्या, त्यांचे पुढील स्वप्न साकारण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी महिन्याच्या दोन तारखेला मतदार संघातील वारकरी किर्तनकार यांना महीन्याच्या एकादशीला ५१ नागरीकांच्या सोडतीद्वारे चिठ्या काढून त्यांना मोफत वाहन, जेवण, नास्ता, राहण्याची व्यवस्था आमदार किशोर पाटील यांचे वतीने करण्यात आली, दिनांक १ मार्च रोजी शिवतीर्थ चिंतामणी कॉलनी पाचोरा येथे रात्री आठ वाजता माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील , आमदार किशोर पाटील यांच्या मातोश्री श्रीमती नर्मदाबाई धनशिंग पाटील यांनी वाहनपुजन करून हिरवी झेंडी दाखवून वारकऱ्यांना सुभेच्छा दिल्या, या वेळी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अँड दिनकर देवरे, नगरसेवक राम केसवाणी, भरत खंडेलवाल, आमदार पाटील यांचे स्विय सहाय्यक राजु पाटील, भागवत पाटील, नाना वाघ उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यांनी त्याचे वडील कै. धनशिंग पाटील यांचे स्मरणार्थ फेब्रुवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत मतदार संघातील दरमहीन्याला ५१ भाविकांना पंढरपूर यात्रा घडविण्याचे ठरविल्या प्रमाणे दिनांक १ रोजी साहेबराव पाटील (जारगांव), भगवान तेली (खडकदेवळा), संभाजी जगदाळे, अरुण माळी, राजेंद्र भगत (कुऱ्हाड), योगेश सिरसागर (कोल्हे), माणीक शिंपी, मोतीलाल कुंभार, जिजाबाई चौधरी, गोविंदा चौधरी, बेबाबाई कुंभार, कैलास धनगर, कमलबाई गायकवाड, (लोहारा), बाबुराव सुर्यवंशी (माहेजी), प्रकाश बोरसे (नांद्रा), सुमनबाई राऊळ (नगरदेवळा), यमुनाबाई हाटकर, बेबाबाई हाटकर, शोभाबाई महाजन, कमलबाई शेळके, (पाचोरा), सुवर्णा चव्हाण, सुधाकर शिंदे, शोभाबाई शिंदे, जनाबाई शिंदे, अनिता चव्हाण, (आंबेवडगांव), बबन पाटील (भातखंडे), अरुण गुरव, बाजीराव पाटील, मांगीलाल पाटील, (गाळण), प्रल्हाद पाटील, भिका पाटील, (गोरागखेडा), सुमित्रा पाटील, आनंदा पाटील, (चिंचपूरा), ज्ञानेश्वर राउत, (निंभोरी), उषाबाई पाटील (पिंपळगाव हरे), जगन पाटील, मथूरा पाटील, (शिंदाड), दिलीप पाटील, मंगलाबाई पाटील लिलाबाई शिंपी, (जारगाव), नाना हाटकर पाचोरा, सरला पाटील, लताबाई पाटील (सारोळा), उषाबाई परदेशी सावखेडा, सखुबाई पाटील, दशरथ पाटील, तारखेडा, गुलाब पाटील वाणेगांव अशा ५१ भाविकांना पंढरपूर येथे पाठविण्यात आले त्यांचे सोबत सेवेसाठी उपतालुकाप्रमुख भागवत पाटील व प्रभाग क्रमांक आठचे स्वंयमसेवक बंडू सोनार यांना पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.