कालीचरण महाराजांना अटक

0

रायपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपूर्वी कालीचरण महाराजांनी  धर्म संसदेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातच आता मध्ये प्रदेशमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.

कालीचरणला मध्यप्रदेशच्या खजूराहो मधून अटक कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रायपुर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडच्या रायपुरमध्ये झालेल्या धर्म संसदेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

कालीचरण यांने काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला नमस्कार करतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला गेला होता. देशातील वेगवेळ्या राज्यांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांकडून देखील कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी  वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसऱ्या एका प्रकऱणात कालीचरणवर गुन्हा दाखल केला आहे. कालीचरण आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केकेलं वक्तव्य भोवलं असून, याआधी 2 ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.19 डिसेंबरला नातूबागेतील अफझलखानाचा आनंदोत्सव साजरा कऱण्यासाठी कालीचरण आला होता. या प्रकरणात कलम 297, 298 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.