कार अपघातात शेंदुर्णीतील युवकाचा जागेवरच मृत्यू ; एक गंभीर जखमी

0

– आंबे वडगांव जवळील घटना
पाचोरा (प्रतिनीधी) : तालुक्यातील आंबे वडगांव येथील के. पी. सी. कॉटन जिनींग जवळ भरधाव वेगाने येत असलेली ईर्टीगा कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही कार वडाच्या झाडाला आढळली. यात कार चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. जखमींवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि १९ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान शेंदुर्णी येथील योगेश राजेंद्र कुमावत व १९ हा येथील ज्युनिअर कॉलेज मध्ये ११वीच्या वर्गात शिक्षण घेणारा विद्यार्थी व त्याचा मित्र अक्षय वसंत गुजर वय – २० वर्षे हे दोघे जण इर्टीगा सुझुकी एम एच १५ जी ए ८२९७ ह्या गाडीत बसून गाडीची ट्रायल घेत होते. योगेश राजेंद्र कुमावत हा स्व:हा गाडी चालवीत होता. गाडी इतक्या वेगात होती की तीच्या वरील ताबा सुटल्याने तीने पाच पलट्या घेऊन मेन रोड पासून २०० फूट बाजूला जावून वडाच्या झाडाला धडक दिली अन् गाडीचा चेंदामेंदा झाला. वाहन चालक कुमावत हा जागेवरच ठार झाला, तर त्याचा मित्र अक्षय वसंत गुजर हाही अत्यवस्थेत असून त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत योगेश कुमावत याचे पाच्छात आई वडिल एक भाऊ एक बहीण असा परिवार असुन तो ” फुगे घ्या फुगे,” फेम सचिन कुमावत यांचा पुतण्या आहे. मयताचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. योगेश याचे निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. त्याचेवर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आली. घटनेप्रकरणी पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राकेश खोंडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.