कामगाराचा मृत्यू; दीपनगरात दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार शैलेंद यादव (वय ३५, रा.लेबर कॉलनी, मूळ रा. बिहार) हा दोन दिवसापासून आजारी होता. उपचारासाठी त्याला वरणगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त कामगारांनी प्रकल्प कार्यालयासमोर दगडफेक केली. यात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करावा लागला. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता दीपनगरात घडली.

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार शैलेंद यादव (३५, रा.लेबर कॉलनी, मूळ रा. बिहार) हा दोन दिवसापासून आजारी होता. उपचारासाठी त्याला वरणगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.  या प्रकारामुळे कामगार संतप्त झाले. ते दीपनगर प्रकल्प कार्यालयासमोर एकत्र जमले आणि या कार्यालयावरच त्यांनी दगडफेक केली.

दरम्यान काही क्षणातच पोलीस तिथे पोहोचले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.  यानंतर दीपनगर येथील परिस्थिती आटोक्यात आली. दीपनगर प्रकल्पाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.