कर्नाटकातील सत्तानाट्य मुंबईत ; बंडखोर आमदारांकडून सुरक्षेतेची मागणी

0

मुंबई :- कर्नाटकातील सत्तानाट्य मुंबईत येऊन धडकले आहे. दरम्यान, राजीनामे दिलेले कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएसचे आमदार यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राजीनामे दिलेले बंडखोर आमदार सध्या मुंबईच्या रेनसॉंस हॉटेलमध्ये असून त्यांच्या मनधरणीसाठी कॉंगेसचे नेते शिवकुमार यांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, शिवकुमार यांना भेटण्या रोखावे, असं पत्र आमदारांनी मुंबई पोलिसांना दिलंय. त्यामुळे रेनेसाँ हॉटेलमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, “कर्नाटक सरकार आम्हाला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असून आम्हाला सुरक्षा द्या, तसेच डी.शिवकुमार यांना हॉटेलच्या बाहेरच थांबवा” अशी मागणी बंडखोर आमदारांनी केली आहे. तर तिकडे शिवकुमार यांनी या हॉटेलमध्ये आपला भाऊ थांबला असून हॉटेलमध्ये जाण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यासर्व गोंधळात बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी ‘कुमारस्वामी गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष हा नेमका कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.