करवाढी विरोधात भाजपाची स्वाक्षरी मोहीम

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत नगरपरिषद प्रशासनाने वरणगाव शहरातील सर्व नागरिकांच्या मालमत्तेवर, वृक्ष कर, शैक्षणिक कर, घनकचरा कर, रोजगार हमी कर, शौचालय कर यासह नागरिकांच्या मालमत्तेवर जुलमी करवाढ  प्रशासनाने केल्याने नागरिक या कर वाढीचा  विरोध करीत असुन  करवाढ रद्द करा या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाने बस स्थानक चौकात स्वाक्षरी मोहीम राबविली.

शहरातील एक हजार नागरिकांनी यात विरोध नोंदविला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, आकाश निमकर, सुनील माळी, ए. जी. जंजाळे, हाजी अल्लादिन शेठ, गजानन वंजारी, हितेश चौधरी, योगेश माळी, संदीप भोई, महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी, शामराव धनगर, सुभाष धनगर, ज्ञानेश्वर घाटोळे, कमलाकर मराठे, प्रताप दिव्यवीर, रमेश पालवे, युवराज भोई, पप्पू ठाकरे, डॉ. नाना चांदणे, मुस्लिम भाई अन्सारी डॉ. सादिक शेख साबिर कुरेशी, नाना चौधरी, दीपक चौधरी यासह असंख्य कार्यकर्त्ये उपस्थितीत होते.

यावेळी वरणगावकरांवर करवाढ करणाऱ्या महाविकास आघाडी चा धिक्कार असो  करवाढ रद्द झालीच पाहिजे यासह भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणानीं परिसर दणाणून सोडले     प्रशासकीय राजवटीत नगरपरिषद प्रशासनाने वरणगावकरांवर वाढवलेली करवाढ रद्द करा यासाठी स्वाक्षरी  जनआंदोलन जोरात झाले या आंदोलनात सरकारच्या  विरोधात जनतेने उत्स्फूर्तत सहभाग घेतला यापुढे नगर परिषद प्रशासनाने दरवाढ रद्द जर रद्द नाही केली तर १४ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने  करवाढ रद्द करा या मागणीसाठी  जनआक्रोश   नागरिकांचा मोर्चा  काढण्यात येणार असुन नागरिकानी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे अवाहन सुनिल काळे यानी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.