कमळ कोमेजले; 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी पक्षप्रवेश केला.

ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे -पलाघर जिल्हा समन्वयक मा. खा. आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी ना. आव्हाड यांनी सौ. पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीदेखील राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली.

उल्हासनगरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढली होती. परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र, आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे.  टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे 21 नगरसेवक, 19 माजी नगरसेवक,  वरप, कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच,  ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे 114 जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये  प्रवेश केला आहे.

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या नगरसेवकांमध्ये पंचम ओमी कलानी, डिंपल ठाकूर नगरसेविका तथा सभापती सार्वजनिक बांधकाम विभाग, शुभांगी निकम नगरसेविका, दिपा पंजाबी टिपीडी चेअरमन तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती 2 तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती 2 तथा नगरसेविका, हरेश जग्यासी सभापती – प्रभाग समिती 1 तथा नगरसेवक, कविता गायकवाड, महसूल सभापती तथा नगरसेविका, दिप्ती दुधानी, सभापती प्रभाग समिती 3 तथा नगरसेविका, दिनेश लहिरानी परिवहन समिती सभापती, रेखा ठाकूर – नगरसेविका, सरोज टेकचंदानी – नगरसेविका, आशा भिराडे – नगरसेविका, सविता तोरणे-रगडे – नगरसेविका, रविंद्र बागुल – नगरसेवक, मनोज लासी, नगरसेवक, चंद्रावती देवीसिंग, नगरसेविका, ज्योती पाटील – नगरसेविका, ज्योती चैनानी – नगरसेविका, गजानन शेळके यांचा समावेश आहे. तर, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीचे भारती भगत सरपंच – कांबा गाव, संदिप पावशे उपसरपंच – कांबा गाव, निलेश देशमुख उपसरपंच – म्हारळ गाव, हरिदास पवार सदस्य – कांबा गाव, संतोष पावशे सदस्य – कांबा गाव, ईशा भोईर सदस्य – कांबा गाव, सोनाली उबाळे सदस्य – कांबा गाव, छाया बनकर सदस्य – कांबा गाव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी, मोहन गारो, राजू खंडागरे, होशियारसिंग लबाना, बाबू मंगतानी, लोकूमल कारा, हिरो केवलरामानी, ठाकूर चांदवानी, श्याम मेजर, मिनू दासानी, प्रिथ्वी वलेचा, राजू टेकचंदानी, गिरीधारी वधवा, भगवान लिंगे, फिरोज खान, गोदू क्रिष्णानी, गजानन बामणकर, आंबू भटिजा, कमला क्रिष्णानी, बिस्कीट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष नोनी धनेजा यांनीही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.  तर, आरपीआय नगरसेवक मंगल वाघे आणि पीआरपी नगरसेवक प्रमोद टाळे यांनीही राष्ट्रवादीला सहयोगी राहणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

यावेळी ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, कलानी कुटुंबीयांसह अनेक नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून या सर्वांना पक्षात प्रवेश दिला आहे.  या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उल्हासनगर पंचक्रोशीमध्ये ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.