कंडारीत हाणामारीचे दंगलीत रूपांतर

0

दगडफेक मोटारसायकलींची जाळपोळ, तणावपूर्ण शांतता गुन्हा दाखल

भुसावळ दि. 24 –
तालुक्यातील कंडारी गावात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीचे पडसाद दंगलीत झाल्याची घटना दिनांक 23 रोजी रात्री 11 वाजे दरम्यान घडली . यावेळी एका अज्ञात जमावाने दुस-या गटावर दगडफेक करीत बुलेट पेटवून दिल्याने गावात एकच खळबळ उडाली व ग्रामस्थ भयभीत झाले होते . घटनेचे वृत्त कळताच शहर पोलिसांनी कंडारी येथे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली .दरम्यान, गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे. .
मंगळवार रोजी किरकोळ कारणावरून विशाल आत्माराम मोरे यांच्या घराची तोडफोड करीत त्यांची आई सुमनबाई मोरे (59) यांना मारहाण केली होती.मात्र या घटनेचा राग मनात ठेवून अज्ञात जमावाने भांडणाचा जाब विचारणा-या युवकावर हल्ला करून दगडफेक केला भांडणाचे पडसाद दंगलीत झाले.
छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्ससमोर त्यांची बुलेट (एमएक्सक्यू 2852) लावली असताना 50 ते 60 जणांच्या अज्ञात जमावाने हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी पाईप, दगड-विटा घेवून एकमेकांसमोर आले व संदीप सिंगारेचा भाचा गोलू (पूर्ण नाव, गाव माहित नाही) व त्याच्या साथीदारांनी बुलेट पेटवू दिली यात मोरे यांचे सुमारे 90 हजारांचे नुकसान झाल्याने याबाबत संजय मुरलीधर मोरे (नागसेन कॉलनी, कंडारी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली यावरून भाग -5, गु र .नं . 23/2019 नुसार भादवी 143, 147, 148, 149. 435, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .तपास पो उपनिरीक्षक काशिनाथ टी सुरळकर करीत आहे.
दरम्यान, कंडारीतील तणावाची स्थिती पाहता डीवायएसपी गजानन राठोड, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह शहर पोलिसांनी धाव घेत जमाव पांगवला. या घटनेनंतर पोलिसांनी गावातून रूट मार्च केला.असून कंडारी येथे तणाव पूर्ण शांतता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.