एरंडोल पालिकेतर्फे “स्वच्छता ही सेवा” या मोहिमेचा शुभारंभ

0

एरंडोल (प्रतिनिधी) :  येथे नगरपालिका तर्फे १८ सप्टेंबर २०१९ रोजी “स्वच्छता ही सेवा” ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी, व्यवसायिक व महिला बचत गटांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी एरंडोल शहर प्लास्टिक मुक्त करावे असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी प्रतिसाद देऊन सदर मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार केला.

या सभेत एरंडोल शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक चौधरी, राजेंद्र मानुधने, सुरेंद्र लढे, गोटू काबरा, अमोल काबरा, गजानन वाणी, गोटू ठाकूर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक किरण देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी संजय ढमाळ यांनी केले. शेवटी महेंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.