एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे विहीरीत आढळून आले तरूणीचे प्रेत

0

एरंडोल-प्रतिनिधी

एरंडोल- तालुक्यातील पिंपळकोठा बु. येथे लक्ष्मी दिपक मोरे( वय १९ वर्षीय) तरूणीचे प्रेत गावाशेजारील नरसिंग दशरथ पाटील यांच्या शेतातील विहीरीच्या पाण्यात तरंगताना आढळून आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ते प्रेत विहीरीतुन काढून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले . याबाबत येथील पोलीस पाटील रविंद्र अमृत पाटील यांच्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला १५/२०२१ सी.आर.पी.सी .१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढिल तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महेन्द्र पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.