एकमुस्त ठेक्याची माहिती घेवून मार्गी लावा

0

 उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांच्या उपायुक्तांना सूचना

जळगाव – एकमुस्त ठेक्याची आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याकडून माहिती घेवून काम मार्गी लावण्याच्या सूचना उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे नवे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांना बुधवारी दिल्या. स्वच्छतेच्या ठेक्याचे सर्व सोपस्कार पुर्ण झाले आहेत. महानगरपालिकेला या ठेक्यासाठी 75 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. त्याचप्रमाणे घनकचरा संकलनासाठी 7 कोटीची वाहने मनपाने खरेदी केली आहेत. लांबत जाणाऱ्या एकमुस्त ठेक्याच्या अंमलबजावणीने शहरातील कचऱ्याच्या समस्या वाढल्या आहेत. महानगरपालिकेने 7 कोटी रुपये खर्च करुन खरेदी वाहने गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहेत. त्यामुळे या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही उद्भवणार आहे. एकमुस्त ठेक्यामुळे जुन्या मक्तेदारांना हात वर केल्यामुळे शहराच्या आरोग्याच्या प्रश्‍नानेही गंभीर स्वरुप धारण केले आहे. 2012पासूनची बिले थकीत असल्याने नेहमीच्या पुरवठादारांनी जंतुनाशके व औषधी द्यायला नकार दिलेला आहे. याबाबत नव्याने निविदा काढण्यात आली असून 1 ऑगस्टपासून त्याचे नियोजन केले जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.