एकनाथ खडसे भाजपच्या कार्यकारिणीत सहभागी होणार

0

मुंबई- भाजपच्या राज्य प्रदेश पदाधिकारी आणि प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली असून, दादरच्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयात बैठक सुरू आहे. बैठकीला प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, खासदार प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत. इतर नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेसुद्धा व्हिडीओ कॉफरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला संबोधित करणार आहेत. केंद्राने मंजूर केलेला कृषी कायदा, कामगार कायदा तसेच इतर विषयांवर या बैठकीच चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल हेसुद्धा दिल्लीतून या बैठकीत सहभागी होणार आहेत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर, विजया रहाटकर या नवनियुक्त सदस्यांचं स्वागत केलं जाईल, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली होती. किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पण भाजपाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात कुठेही खडसेंचा उल्लेख नव्हता. तसेच एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे खडसे नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. पण एकनाथ खडसे प्रत्यक्ष हजेरी न लावता ऑनलाईन प्रणालीद्वारे भाजपच्या कार्यकारिणीत सहभागी होणार असून, खडसे वसंतस्मृतीला जाणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.