उसाच्या शेतात बिबट्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

0

चाळीसगाव :- तालु्नयातील उंबरखेडे येथील शेतकरी संजय पाटील यांच्या मेहूणबारे गिरणा नदी शिवरात ऊसाच्या शेतात काल दुपारी बिबट्या मृत अवस्थेत आढळला. या घटनेनंतर परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा मारहाणीत मृत्यु झाला की अन्य कारणाने हे कळून आले नाही. गेल्या तीन महिन्यात दुसर्‍यांदा बिबट्याचा मृत्यु झाल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.या बिबट्याचा व्हिसेरा नाशिक येथे पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्युचे कारण समजून येणार आहे.

या बाबत माहिती अशी की, मेहुणबारे शिवारातील संजय चुडामन पाटील यांच्या ऊसाच्या शेतात गटनंबर 465 मध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळला.या घटनेची माहिती मिळताच शासनाचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे जळगावचे उपवनसरक्षक पशुधन विकास अधिकारी व मेहुणबारे पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.मृत बिबट मादी असुन तिचे वय दिड ते दोन वर्षे असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.या घटनेचा पंचनामा करून बिबट्याचे डाँ. राठोड, व दीप्ती कच्छवा जागेवरच विच्छेदन केले. मृत बिबट्याला चाळीसगाव येथील वनक्षेत्र विभागाच्या पंटागणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मृत बिबट्याचा व्हीसेरा नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे साहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांनी सांगितले.यावेळी जळगावचे साहायक वनसरक्षक केशव फंड, घोडेगाव वनपाल प्रकाश देवरे, एस. बी.चव्हाण,आर.व्ही.चौरे, संजय जाधव, प्रविण गवारे, राहुल पाटील, अजय महिरे,सुरेश पगारे, बाळु शितोळे,श्रीराम राजपुत,भटु अहिरे,संजय देवरे आदी उपस्थित होते.या घटनेचा तपास उपवनसरक्षक जळगाव दिंगबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली धनजय पवार हे करीत आहे.

तीन महिन्यात दुसरी घटना
तालु्नयात बिबट्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याची तीन महिन्यातील ही दुयरी घटना आहे.यापूर्वी तालु्नयातील रोकडे शिवारात सुनील पाटील यांच्या शेतातील बांधावर 11 मार्च 2019 रोजी लिंबू बागेजवळील बांधावर मृत बिबट्या आढळून आला होता.हा बिबट्या नरभक्षक व 3 ते 4 वर्षे वयाचा होता. आता पुन्हा मेहूणबारे शिवारात मृत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या परिसरात गेल्या एक ते दोन वर्षापासून बिबटयांनी भयंकर उच्छांद मांडला होता. उंबरखेड, वरखेड शिवारात तर नरभक्षक झालेल्या बिबट्याने सात जणांचा बळी घेतला होता. शेवटी शार्प शुटरद्वारे गोळ्या घालून बिबट्याला ठार मारण्यात आले होते. त्यानंतरही गिरणा पट्ट्यात बिबट्याचे भय संपले नव्हते.या नंतही या भागात बिबट्याचे सातत्याने दर्शन होतच राहिले. त्यातच सापळ्यात या परिसरात दोन बिबट्यांना पकडण्यात यश आले होते तर दोन बिबटे मृत अवस्थेत आढळून आले.

तीन महिन्यापूर्वी रोकडे शिवारात मृत अवस्थेत बिबट्या आढळला. त्यानंतर बिबट्याचे परिसरात कुठेही अस्तित्व नसल्याचे बोलले जात असतांना रविवारी पुन्हा मेहूणबारे परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीने गाळण उडाली आहे.या शिवारात आणखी किती बिबटे आहेत असा सवाल केला जात आहे.मेहूणबारे शिवारात संजय पाटील यांच्या शेताजवळ मृत आढळलेल्या बिबट्याचा मृत्युचे कारण अद्याप समजून आले नाही. तथापि मारहाणीत वा जाळ्यात अडकल्याने तो ठार झाला असावा असा कयास लावला जात आहे.तीन महिन्याच्या अंतराने लागोपाठ दोन बिबट्यांचा मृत्यु होतो ही बाब गंभीर असल्याचे बोलले जाते. पुन्हा बिबट्या आढळल्याने गिरणा पट्ट्यात पुन्हा भितीचे सावट पसरले आहे. सध्या शेतीहंगामाचे दिवस असल्याने शेतकरी, शेतमजुरांचा राबता शेतातच असतो. या पार्श्वभूमीवर गिरणा पट्ट्यात आणखी बिबट्या तर नाही ना यासाठी शोधमोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.