वैजनाथ येथील वाळू ठेकेदारास २ लाख ८० हजाराचा दंड

0

  जळगाव ;- एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील वाळू ठेकेदारास जिल्हा प्रशासनाने २ लाख ८० हजार रूपयांचा दंड केला आहे. अतिरीक्त वाळू उपशाप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याने वाळू ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. .वैजनाथ येथील वाळू ठेक्याच्या ठिकाणावरून क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यावरून जळगाव तहसीलदार, एरंडोल तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिर्का­यांनी मोजणी केली होती. जादा वाळू उपसा केल्याप्रकरणी ठेकेदार धनराज घुले यांना २ लाख ८० हजारांचा दंड करण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान, या वाळू ठेक्यासंदर्भात आता पुन्हा नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार श्री.गाडीलकर यांनी स्वत: प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, तेथे जागेवर वाळू उपशाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे आढळून आले. यावरून त्यांनी जळगाव प्रांताधिकारी, एरंडोल प्रांताधिकारी, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांची मोजणी करून संबंधित ठेकेदाराने किती जादा वाळू उपसा केला याबाबत मोजणी करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

वाळू ठेक्याच्या मोजणीचा अहवाल हा गुळगुळीत करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला जावा, अशी अपेक्षा तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे. दि. २ एप्रिलपर्यंत हा अहवाल सादर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.