उन्नाव बलात्कार प्रकरण ; आ. कुलदीप सेंगर दोषी

0

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणी आज दिल्लीतील तीस हजारी कोर्टात निकाल सुनावला. यात भाजप आमदार कुलदीप सेंगरला कोर्टाने दोषी ठरवले असून शिक्षेवरील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. सेंगर आणि त्याच्या साथीदारांना भाजपमधून काढून टाकण्यात आले. यांनी 2017 मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. दरम्यान, आरोपपत्र उशिरा दाखल केल्याबद्दल कोर्टाने तपास करणाऱ्या सीबीआयला फटकारले. या प्रकरणातील सहआरोपी शशी सिंह यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी गेल्या आठवड्यातच या संदर्भातील निर्णय राखून ठेवला. या खटल्याची सुनावणी आज दिल्लीच्या कोर्टात झाली.

काय होते संपूर्ण प्रकरण ?

गेल्या वर्षी कुलदीपसिंग सेंगर यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. असे म्हटले होते की जून 2017 मध्ये सेंगरने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या म्हणण्यानुसार, बलात्काराच्या वेळी ती अल्पवयीन होती.पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यास ती स्वत: ला पेटवून घेईल, अशी धमकीही या मुलीने दिली होती. या धमकीनंतर पोलिसांनी सेंगरवर गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याला एप्रिल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.