आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी मतदार संघातील उडीद मुग पिकांचे पंचनाम्याचे आदेश

0

सोमवारपासुन सुरू झाले पंचनामे

अमळनेर (प्रतिनिधी):- संततधार पावसामुळे अमळनेर मतदारसंघात नुकसान झालेल्या मूग, उडीद पिकाचे पंचनामे करण्यासंबधी तातडीने अधिका-यांना आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत त्यामुळे सोमवारपासून मतदारसंघात पंचनामे सुरू झाले आहेत.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देखील सोमवारी तहसीलदारांना पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याने मतदारसंघातील गावातील शेतकऱ्यांच्या उडीद मूग पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर व पारोळा तालुक्यातील मूग आणि उडीद या पिकांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. उडीद मूग पिकाला विम्याचे कवच नाही त्यामुळे या पिकांचे नुकसान शासन ग्राह्य धरत नव्हते याबाबत खान्देशात मोठ्या प्रमाणावर उडीद मूग पिकांचे उत्पन्न घेतले जाते अल्पावधीतच येणारे पीक असून खर्च अत्यंत कमी प्रमाणात लागतो मात्र यंदा पावसाने उघडीप दिली नसल्याने अमळनेर व पारोळा तालुक्यातील विविध गावात शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचे आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ मंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून भ्रमणध्वनीवरून या संपूर्ण नुकसानीची माहिती दिली. तसेच आपण शासनाकडून शेतक-यांना मदत द्यावी अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांना आमदार पाटील यांनी केली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली व याबाबत काहीतरी प्रयत्न करा व मार्ग काढा असे सांगितले आमदार अनिल पाटील यांनी 4 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन उडीद मूग पंचनाम्याची मागणी केली होती. तसेच मंत्री जयंत पाटील यांनी देखील कृषी मंत्री भुसे यांना खान्देशातील उडीद मूग पिकाच्या पंचनाम्याबाबत कल्पना दिली होती त्यावरून कृषी मंत्री भुसे संबंधित अधिका-यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सोमवारी आदेश दिले व शेतक-यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे ग्वाही राज्याच्या कृषिमंत्र्यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.