आषाढ़ी एकादशी निमित्त पंढरपुर साठी विशेष रेल्वे गाड्या धावणार!

0

भुसावळ | प्रतिनिधी 

आषाढ़ी एकादशी निमित्त वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपुर करिता नवी अमरावती ,खामगाव ,आणि भुसावळ स्थानकावरून विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय भुसावळ रेल्वे विभागाने घेतला आहे .

 नवी अमरावती-पंढरपुर विशेष गाड़ी 

क्र.०११५५ ही विशेष गाड़ी दि.६ जुलै आणि ९ जुलै रोजी नवी अमरावती स्थानकावरून दुपारी २ वाजता पंढरपुरसाठी सुटेल.ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ११-१५ वाजता पंढरपुरला पोहचेल. गाड़ी क्र.०११५६ ही विशेष गाड़ी दि.७ जुलै आणि १३ जुलै रोजी पंढरपुर स्थानकावरून  दुपारी ४ वाजता नवी अमरावती स्थानकासाठी सुटेल.ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४०  वाजता नवी अमरावती स्टेशनला पोहचेल .
या गाड्यांना बडनेरा,मुर्तिजापुर, अकोला,शेगांव,जलंब,नांदुरा, भुसावळ,जळगाव, पाचोरा, चाळीसगाव,नांदगाव,मनमाड, कोपरगाव,बेलापुर, अहमदनगर,दौंड,भिगवन,जेऊर, कुर्दुवाडी या स्थानकावर थांबा घेणार आहे . या गाड्यांना ८ सर्वसाधारण,५ द्वितीय शयनयान,२ वातानुकूलित  डबे असतील.

खामगाव-पंढरपुर विशेष
गाड़ी क्र.०११५३ ही विशेष गाड़ी दि.७ व १० जुलै रोजी खामगाव स्थानकावरून  दुपारी ४-२० वाजता पंढरपुरसाठी सुटेल .ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ११-१५ वाजता पंढरपुर येथे पोहचेल . गाड़ी क्र.०११५४ ही विशेष गाड़ी दि.८ व १४ जुलै रोजी पंढरपुर स्थानकावरून  दुपारी ४ वाजता नवी अमरावतीसाठी सुटेल . ही गाड़ी दुसऱ्या  दिवशी सकाळी ८-३० वाजता खामगावला पोहचेल . या गाड्यांना जलंब,नांदुरा, भुसावळ,जळगाव,पाचोरा, चाळीसगाव,नांदगाव,मनमाड, कोपरगाव,बेलापुर, अहमदनगर,दौंड,भिगवन,  जेऊर, कुर्दुवाडी या स्थानकावर थांबे राहतील.  यात ६ सर्वसाधारण,८ द्वितीय शयनयान,२ वातानुकूलित डबे असतील.

 भुसावळ -पंढरपुर विशेष गाड़ी 

क्र ०११४९ ही गाड़ी दि.११जुलै रोजी भुसावळ स्थानकावरून  सकाळी ९-१५ वाजता पंढरपुरसाठी रवाना होईल .ही गाड़ी रात्री १०-१० वाजता पंढरपुर येथे पोहचेल . गाड़ी क्र.०११५० ही विशेष गाड़ी दि.१२ जुलै रोजी पंढरपुर स्थानकावरून रात्री ९-५० वाजता  भुसावळसाठी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८-३०वाजता भुसावळ येथे पोहचेल .  सदर गाड्‍या जळगाव,पाचोरा, चाळीसगाव,पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव,मनमाड,कोपरगाव, बेलापुर,अहमदनगर,दौंड,भिगवन,जेऊर,कुर्दुवाडी या स्थानकावर थांबा राहील.  यात १० सर्वसाधारण व ६ द्वितीय शयनयान डबे असतील. या सर्व गाड्यांची आरक्षण बुकिंग दि. १५ जून पासून सर्व आरक्षण केंद्रावर सुरू होईल असे भुसावळ रेल्वे वाणिज्‍य विभागाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.