आयशरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार ठार तर २ गंभीर जखमी

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धरणगाव तालुक्यातील लोणे गावाजवळ भरधाव आयशरने  दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी  ट्रक चालकाला नागरीकांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तालुक्यातील लोणी फाटा गावाजवळून भरधाव वेगाने जाणाऱ्या  आयशरने (एमएच १९ झेड ३२४३) समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच १९ डीपी ८६०२) ने ट्रीपल सीट जात असतांना जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. तर सोबत असलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीन धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर मयताचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान मयताचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात घडल्यानंतर नागरीकांनी पळून जात असलेल्या आयशर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला आणि धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी  धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.