आयपीएल २०१९ : मुंबईचा ३७ रननी पराभव

0

मुंबई :- यंदाच्या आयपीएल मोसमातल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या २१४ रनचा पाठलाग करताना मुंबईचा १७६ रनवर ऑल आऊट झाला.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉ (७) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१६) झटपट माघारी परतले. पण दुसरा सलामीवीर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत दिल्लीला बळ दिले. या भागीदारीने दिल्लीचा डाव सावरला गेला. पण दोघेही आपल्या अर्धशतकाला मुकले. मात्र त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने तुफान धुलाई केली. ऋषभ पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली. पंतच्या या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २१३ धावा करता आल्या.

हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. मात्र, धावगती राखण्याच्या नादात अवघ्या ५० धावांत तीन गडी झटपट बाद झाले. युवराज सिंगने मात्र त्याचा संघर्ष सुरु ठेवला. ३५ बॉलमध्ये ५३ रन करून युवराज आऊट झाला. युवराजच्या खेळीमध्ये ५ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. कृणाल पांड्याने १५ बॉलमध्ये ३२ रनची खेळी केली. त्याने ५ फोर आणि १ सिक्स लगावली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४ ओव्हरमध्ये २३ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मालाही २ विकेट मिळाल्या. ट्रेन्ट बोल्ट, राहुल टेवटिया, किमो पॉल आणि अक्सर पटेलला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.