आता क्रेडिट कार्डवर मिळणार ‘इंटरेस्ट फ्री’ कॅश; जाणून घ्या कोणती बॅंक देतेय ही खास सुविधा…

0

नवी दिल्ली – आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स (Special Offers) घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये बँक 48 दिवसांसाठी ग्राहकांना व्याजमुक्त रोख अ‍ॅडव्हान्स (Intrest Free Cash) सुविधा देत आहे. आपला क्रेडिट कार्ड (Credit Card) व्यवसाय वाढविण्यासाठी बँकेने ही सुविधा जाहीर केलीय.

 

बँकेच्या या सुविधेमुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डवर बिनव्याजी रोख रक्कम मिळण्याची सुविधा मिळणार आहे. शुक्रवारी बँकेने या दोन्ही सुविधांचा शुभारंभ केला. याशिवाय बचत खात्यावर बँक वार्षिक 7 टक्के दराने व्याज देत आहे.

 

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.मधीवनन म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात प्रथमच या बँकेकडून व्याजमुक्त रोख अ‍ॅडव्हान्सची सुविधा दिली जात आहे. या सुविधेची सध्या तपासणी जात असून लवकरच ही सुविधा ग्राहकांना दिली जाईल.

 

याशिवाय बँक आता क्रेडिट कार्ड स्पेसमध्ये प्रवेश करत आहे. मार्चनंतर या सुविधेचा विस्तार केला जाईल. इतर बँकांकडून 36 ते 40 टक्के शुल्क आकारले जाते परंतु आमच्याकडे 9 ते 36 टक्के प्रति वर्ष शुल्क आहे. वार्षिक टक्केवारी दर ग्राहकांच्या क्रेडिट व्यवहारांवर अवलंबून असेल, असेही बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.

 

बॅंक लाॅंच करत आहे क्रेडिट कार्ड –

 

सध्या क्रेडिट कार्डवरील रोख अ‍ॅडव्हान्सवरील व्याजदर खूप जास्त आहेत. हे लक्षात घेऊनच बँकेने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. या व्यतिरिक्त बँक केवळ वर्षाला 9 टक्क्यांपर्यंत व्याजासह क्रेडिट कार्ड लाॅंच करत आहे. या सुविधेचा लाभ त्या ग्राहकांना देण्यात येईल, ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असेल, असेही बँकेने म्हटले आहे. याचा अर्थ आपला क्रेडिट स्कोर उत्तम ठेवणे महत्वाचे आहे.

 

5 प्रकारचे असतील क्रेडिट कार्ड –

 

बँक पाच प्रकारचे क्रेडिट कॉर्ड लाॅंच करत आहे, ज्यात मासिक व्याज 0.75 ते 2.99 टक्के म्हणजेच 9 टक्क्यांपासून 35.88 टक्क्यांपर्यंत वार्षीक व्याज असेल. First मिलेनिया क्रेडिट कार्ड, First क्लासिक क्रेडिट कार्ड, First सलेक्ट क्रेडिट कार्ड, First वेल्थ क्रेडिट कार्ड आणि एम्प्लाॅयी क्रेडिट कार्ड, अशी त्या कार्डची नावे असतील, असे बॅंकेकडून सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी IDFC बॅंकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.