‘आज ना छोडेंगे तुझे हमजोली…खेलेंगे हम होली’ म्हणत होलिकोत्सव साजरा

0

शहर व परिसरात तरुणाईने केली रंगांची उधळण

भुसावळ :- संपूर्ण देशभरात दुर्गुणांचे दहन होळीत जाळून आनंदाने व हर्षोल्हासाने सर्वत्र होलिकोत्सव साजरा करण्यात आला. होळीच्या दुस-या दिवशी अर्थात ‘धुळवड ‘ सुद्धा आज ना छोडेंगे तुझे हमजोली ..बस खेलेंगे हम होली च्या तालावर सर्वत्र उत्साहाने व आनंदाने साजरी करण्यात आली.

यंदा बहुतेक ठिकाणी कोरडया व नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आलेला दिसून आला तसेच पाणी वापरणे सर्वानी टाळल्याचे दिसून आले. धुळवडीनिमित्त भुसावळ शहर व परिसरातील नागगरीकांसह अबालवृद्धांनी एकमेकांना रंग लावून आपुलकी एकोपा व स्नेह व्यक्त केला. तर अनेक ठिकठिकाणी तरुणाईने डी जे च्या तालावर नाचत आनंदाने रंगांची उधळण करीत धुळवडीचा आनंद लुटला.

भुसावळात महिलांनी साजरी केली धुळवड
भुसावळ :- या धुळवडीचे औचित्य साधून येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय महिला मंच तर्फे “टीळा होळी ” या कार्यक्रमातंर्गत महिलांना पर्यावरण संवर्धनाकरिता प्रत्येक महिलेने एक झाड (वृक्ष ) लावून त्याचे संगोपन करावे, तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करणार अशी शपथ घेऊन संकल्प केला. यावेळी उपस्थित महिलांनी गीत, नृत्य, यासह विविध कलागुण सादर केले. त्यानंतर कोमल नेवे हिने वाजविलेल्या ढोल ताश्याचे तालावर नैसर्गिक रंग लावून एकमेकींना शुभेच्छा दिल्या.

स्थानिक विठ्ठल मंदिर वार्ड भागात पत्रकार उज्वला बागुल यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नरेंद्र मोदी विचार मंच पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्षा सौ रुपाली सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला वकील संघ अध्यक्ष ऍड जास्वंदी भंडारी, पत्रकार उज्वला बागुल, ऍड. कल्पना टेमाणी, सखी श्रावणी मंचच्या अध्यक्षा सौ राजेश्री नेवे, उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते श्री गणेश प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात रुपाली सूर्यवंशी यांनी रासायनिक रंगांचा उपयोग न करता नैसर्गिक रंगांचा वापर करा, नैसर्गिक होळी खेळा, असा संदेश देत महिलांनी एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी केले. जी महिला झाड लावून त्याचे संगोपन उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीने करेल त्या महिलेस बक्षीस देऊन तिचा सन्मान व सत्कार करण्यात येईल अशी ग्वाही सूर्यवंशी यांनी यावेळी दिली . तर प्रमुख पाहुण्या म्हणून ऍड सौ जास्वंदी भंडारी , पत्रकार उज्वला बागुल , ऍड कल्पना टेमणी यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. तसेच प्रसंगी पर्यावरण यावर जान्हवी बागुल, श्रद्धा जाधव, मनीषा ब-हाटे व सायली ढाके यांनीही मनोगत व्यक्त केले. तर राजेश्री नेवे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्यबद्दल माहिती देऊन हिंदू संस्कृती नुसार सण उत्सव परंपरा व रुढींचे जतन करतांनायापुढे देखील असेच विविध उपक्रम राबविण्यात येतील असे आश्वासन महिलांना दिले. प्रसंगी सर्व महिलांनी एक तरी झाड लावेल, पाणी काटकसरीने व जपून वापरेल, परिसर स्वच्छ ठेवेल असा संकल्प केला. सुत्रसंचलन प्रतिभा विसपुते यांनी केले तर आभार भाग्यश्री नेवे यांनी मानले.

यावेळी सर्वश्री राधिका वाणी, मेघा वाणी, सीमा नेवे, अनुराधा टाक, सुनीता नेवे, सुलोचना नेवे, कोमल नेवे, मानसी नेवे, नीलिमा चौधरी, मनीषा चौधरी, मंगला तळेले, चंद्रकला बागुल, मंगला जाधव, मंदा जाधव, कविता जाधव, योगिता डहाके, कल्पना चौधरी, शितल चौधरी, रेणुका चौधरी, वैष्णवी चौधरी, दिपाली बोके, भारती कोळी, आशा कोळी, हेमांगी कोळी, गुंफाबाई, चमेली बाई चौधरी यांच्यासह जेष्ठ महिला व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते .यशस्वितेकरिता विशेष सहकार्य अनिल बागुल, उमेश नेवे, कृष्णा नेवे यांचेसह महिला मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.