आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर ; जाणून घ्या

0

मुंबई : बहुतांश देशांनी कोरोनाची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण सुरु आहे. तेलाचे भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आहेत. मात्र असे असूनही देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर कपात टाळत भाव ‘जैसे थे’च ठेवले आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सलग ३२ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

करोना बळावल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३७ डॉलर प्रती बॅरलवर आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ३८.९७ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. युरोप आणि अमेरिकेतील रुग्णसंख्या वाढल्याने तेलाच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका आणि रशियात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढल्यामुळे तेलाच्या किंमती घसरल्या. युरोपियन देशांत विषाणूमुळे नवे निर्बंध लादले गेल्याने जागतिक आर्थिक सुधारणेची गती आणखी कमी होऊ शकते व त्यामुळे तेलाचे दरही आणखी घसरू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.