अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बाप व मुलीचा पवित्र नात्याला काळिमा लावणारी घटना
अत्याचार प्रकरणात आज आदेश बाबाला मरेपर्यंत शिक्षा मिळाली तर दुसरी कडे हि घटना उघडकीस आली
दि ३० – येथील एमआयडीसी भागातील एम. ए. सी. बी कॉलनी परिसरात राहणाऱ्या बापाने आपल्या सख्या मुलीवर गेल्या चार वर्षांपासून बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना घडली असून पीडित अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून नराधम बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी कि महावितरण कंपनीचा कर्मचारी याने त्याची मुलगी निर्भया (नाव बदललेले ) हिच्यावर २०१६ ते २०१९ पर्यंत अशी एकूण चार वर्षे मुलीवर बलात्कार केला. आई बाहेर गेल्यानंतर तिला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत नराधम बापा ने वेळोवेळी अत्याचार केला . याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय संदीप पाटील करीत आहे.