अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

0

भुसावळ (प्रतिनिधी)-   येथील श्रध्दा नगर भागातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनायभंग केल्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रध्दा नगर भागात दि ३० रोजी १४ वर्षाच्या मुलीला आरोपी राजेंद्र भगवान पाटील (रा.श्रद्धा नगर भुसावळ) याने मुद्दामहुन हेतुपुरस्कर पणे जाणून बुजून धक्का देऊन पिडित मुलीचा विनयभंग केल्यामुळे आरोपी राजेंद्र भगवान पाटील यांच्या विरुद्ध फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भा.द.वि.कलम – 354,504,506 बाललैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका ठाकरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.