अयोध्या प्रकरण ; मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी नकाशा फाडला

0

नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून आजच्या सुनावणीवेळी नाट्यमय घडामोडी पाहयला मिळाल्या. राम मंदिरवर हिंदू महासभेच्या वकिलांनी ऑक्सफोर्ड पुस्तकातील नकाशाचा हवाला दिला. यावेळी मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी या पुस्तकाचा नकाशा फाडला.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आजचा सुनावणीचा 40 वा दिवस आहे.   त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेतेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना 17 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.