अट्रावल येथील मुंजोबा ने घेतला आज अग्नीडाग

0

यावल । प्रतिनिधी

संपूर्ण खानदेशातील भाविकांचे, नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबाने आज दिनांक 10 एप्रिल 2020 शुक्रवार रोजी सकाळी अग्नीडाग घेतला. मुंजोबाने नैसर्गिक रित्या घेतलेल्या अग्नीडागाचे दृश्य पाहण्यासाठी अट्रावल परिसरातील भाविकांनी आज सकाळी मुंजोबा देवस्थानाजवळ मोठी गर्दी करून दर्शन घेतले व मोठा आनंद व्यक्त केला.
अट्रावल येथील जागृत तथा भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेल्या मुंजोबाची यात्रा सालाबाद प्रमाणे दरवर्षी माघ महिन्यात फक्त शनिवार आणि सोमवार या दिवशी भरत असते यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील व संपूर्ण खानदेशातील भाविक मुंजोबाचे दर्शनासाठी आणि लहान मुलाचा मान देऊन वरण बट्टी चा प्रसाद नैवद्य चढविण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात यावेळी मुंजोबाला लोणी, नारळ, पुष्पगुच्छ, हार अर्पण केलेले असते हे संपूर्ण साहित्य मुंजोबाचा च्या मूळ प्रतिमेवर स्थानावर आहे त्या स्थितीत कायम असते, यात्रा झाल्यानंतर कोणत्याही दिवशी आणि केव्हापण कोणत्याही वेळेला ( यात्रा संपल्यानंतर आठ दिवसात किंवा महिना दोन महिन्यात किंवा सहा महिन्यात ) मुंजोबाचा ठिकाणी हे सर्व साहित्य अचानक पेट घेत असते यालाच मुंजोबा ने अग्नीडाग घेतला असे भाविक नागरिक म्हणत असतात मग नंतर मुंजोबा मंदिर देवस्थान मंडळातर्फे संपूर्ण ग्रामस्थांना भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करीत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.