अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा ; पार्थ पवारांनी केले खंडन

0

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरली आहे. खुद्द अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून ते स्वत: क्वारंटाइनमध्ये राहत आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांनी दिली.

अंगदुखी आणि ताप आल्यामुळे अजित पवार यांना दोन दिवसांपासून बरे वाटत नव्हते.  त्यामुळे अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली. मात्र, कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.  पण थोडी ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रम थांबाविले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.