अखेर वाङे गावात भङगावची बस पोहोचली

0

भङगाव | प्रतिनिधी

सध्या भङगाव ते वाङे या सर्व बस फेर्या भङगाव बसस्थानकाने बंद केल्या होत्या.  वाङे ते बांबरुङ प्रब दरम्यान पाईपलाईन अर्धवट कामाने रस्ताही खराब होता.कधी भङगावहुन बसफेर्या बंद तर कधी गोंङगाव पर्यंतच बस फेर्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रवासासाठी मोठे हाल होत होते. तरी भङगाव ते वाङे सर्व बस फेर्या बंद न करता  तात्काळ व नियमित सुरु करण्यात याव्यात प्रवाशांची प्रवासाची सोय करावी. या मागणीचे निवेदन वाङे गावामार्फत भङगाव तालुका पञकार संघाचे अध्यक्ष अशोक महादु परदेशी यांनी भङगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक ए. एम .पाटील, पाचोरा आगारप्रमुख यांच्या नावाने दि. ७ रोजी देण्यात आले होते. अखेर निवेदनाची दखल घेत भङगाव ते वाङे , जळगाव ते वाङे  बंद बस फेर्या चालु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. भङगाव , पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते कि,  भङगाव ते वाङे बस फेर्या सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत. वाङे ते बांबरुङ प्रब दरम्यान रस्त्यावरील वळणावर पाईपलाईनच्या कामामुळे व चिखल झाल्याने या आठवङयात भङगाव ते वाङे बसफेर्यांना अङचणी निर्माण झाल्या होत्या.बस फेर्या या वाङे गावापर्यंत न जाता गोंङगाव पर्यंतच प्रवाशांना  बसमधुन उतरविण्यात येत होते. त्यामुळे प्रवाशांना गोंङगाव पासुन दिवसा , राञी ७ ते ८ कि. मी. वाङे गावापर्यंत पायी प्रवास करुन ञास सहन करावा लागत होता .त्यामुळे प्रवाशी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.वाङे ते बांबरुङ प्रब दरम्यानच्या पाईपलाईनच्या खङङयात संबंधितांनी मातीचा भराव केला असुन रस्ता वाहतुकीस सोयीचा दिसत आहे.तरी आगार प्रमुखांनी तात्काळ रस्त्याची पाहणी करुन भङगाव ते वाङे गावापर्यंत सर्व बस फेर्या सुरळीत सुरु कराव्यात. व बंद केलेल्या बस फेर्याही सुरु कराव्यात.नागरीक, प्रवाशी, विदयार्थ्यांचा ञास थांबवावा.आता शाळाही सुरु होणार आहेत. तरी तात्काळ दखल घ्यावी. भङगाव ते वाङे सर्व बस फेर्या तात्काळ सुरु कराव्यात,असेही शेवटी निवेदनात नमुद केले होते.   भङगाव ते वाङे बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात येतील. असे आश्वासन भङगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक ए एम पाटील यांनी दिले होते. दैनिक लोकशाही वृत्ताची  दखल घेत एस टी महामंङळाने भङगाव  ते वाङे, जळगाव ते वाङे बस फेर्या वाङे गावापर्यंत सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाङे येथील प्रवाशी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरीकांनी एस टी महामंङळाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. भङगाव व पाचोरा आगाराने भङगाव ते वाङे व जळगाव ते वाङे अशा संपुर्ण बसफेर्या सुरळीत सुरु ठेवाव्यात अशी अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.