अखेर भङगावला ४ वर्षानंतर मिळाले तालूका कृषीअधिकारी

0

 

भङगाव- सागर महाजन

भङगाव तालुका कृषी अधिकार्याची जागा तब्बल ४ वर्षापासुन रिक्तच होती. नुकतेच नवीन तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरङे रुजु झाले आहेत. अखेर ४ वर्षानंतर भङगावला तालुका कृषी अधिकारी मिळाले आहेत.
याबाबत माहीती अशी कि, भङगाव तालुका कृषी विभागाचे कार्यालय भङगाव पासुन चाळीसगाव रस्त्यालगत आहे. या कृषी कार्यालयात तब्बल ४ वर्षापासुन तालुका कृषी अधिकार्याची जागा रिक्तच होती. सध्या तालुका प्रभारी कृषी अधिकारी म्हणुन ए .व्ही .जाधव हे कामकाज पाहत होते. या कृषी कार्यालयात प्रभारी अधिकार्यांचाच राज राहीला. त्यामुळे तालुका कृषी विभाग जणु वार्यावर होता. कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नसल्याने शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ, वा शेतकर्यांना फारसे मार्गदर्शन मिळत नसल्याचे दिसुन येत होते. या कार्यालयावर वचक नव्हता.असे शेतकरी वर्गात चर्चा होतांना दिसत होती. कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी मिळावा अशी मागणी कायम होती. शासनाने दखर उशीराका असेना दखल घेतली. अखेर भङगाव तालुका कृषी कार्यालयात नुकतेच तालुका कृषी अधिकारी म्हणुन बी बी गोरङे हे रुजु झाले आहेत. त्यांनी पदभारही नुकताच घेतला आहे. ते यापुर्वी जळगाव जिल्हा परीषदेत कृषी विभागात ( विघय ) विभागात कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. त्यांची भङगाव येथे बदली झाली असुन त्यांनी तालुका कृषी अधिकारी पदाचा चार्ज घेतला आहे. त्यांची सेवा एकुण पावणेचार वर्ष झाली आहे. त्यांचे मुळ गाव संगमनेर हे आहे. कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कृषी अधिकारी बी बी गोराङे यांनी तालुक्याचा सर्वे करावा. खरीप हंगाम पेरणीपुर्व शेतकर्यांसाठी मार्गदर्शन म्हणुन कार्यशाळा आयोजीत करावी. कपाशी बोंङअळी रोगाबाबत मागील वर्षापासुन शेतकरी वर्गात धास्ती आहे. याबाबतही शेतकर्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.