अखेर गोंदेगावतांड्यापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरु

0

शेंदुर्णी,ता.जामनेर :-येथून जवळच असलेल्या गोंदेगाव तांडा येथून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी कोणतीही उपाय योजना नसल्याने पालकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी खेट्या माराव्या लागत होत्या तर काही मुले हि ७ ते ८ किमी पायपीट करत होती त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अनंत अडचणी येत होत्या त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची अडचण ओळखून गावातील भाजप कार्यकर्ते विकास पवार आणि आदि पालकांनि जामनेर बस डेपो व्यवस्थापक के.ए. धनराले साहेब यांच्याकते कैफियत मांडून पाठपुरावा केला असता अखेर पालकांच्या प्रयत्नांना यश येऊन जामनेर बस डेपो तर्फे गोंदेगाव तांडा ते शेंदुर्णी बस सेवा सोमवार दि ८ रोजी सुरुवात झाली. बस सेवा सुरु झाल्याने अनेक पालकांचा जीव भांड्यात पडला असून आता विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण घेण्यासाठी येजा करता येणार असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शालेय वेळेनुसार दिवसातून चार फेऱ्या मारण्यात येणार आहे.

बसचे आगमन होताच ग्रामस्थांनी स्वागत करीत पूजन केले आणि विकास पवार यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. याप्रांसगी गावातील ग्रा.प सदस्य कलाबाई पवार पराशीबाई चव्हाण ,शांताबाई पवार,वी.का.सो.संचालिका दुर्गाबाई जाधव, किसान पवार शंकर चव्हाण वसंत राठोड गोविंद राठोड, सांडू पवार, तुकाराम पवार, सुभाष राठोड, रमेश जाधव, हरलाल पवार, शेश्माल पवार, पांडुरंग राठोड, हे उपस्थित होते.
तर ग्रामस्थांनी बस चालक श्री. घोंगडे, आणि वाहक श्री.चौधरी, यांचा सत्कार करण्यात आला.

यासाठी मा.ना.गीरीशभाऊ महाजन यांनी सहकार्य केले. तर भाजप ज्येष्ठ नेते अशोक औटे, गोविंद अग्रवाल तसेच सैदास पवार नारायण चव्हाण मदन जाधव, मधुकर राठोड, वसंत राठोड, स्थानक प्रमुख जी दि वाघ, वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.