अखिल भारतीय मिना समाज महासभा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दिपक परदेशी

0

पाचोरा (प्रतिनिधी) ; आखिल भारतीय मिना समाज महासभा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रेमसिंह घुसिंगा यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष विजयसिंग कायठे यांच्या शिफारशी नुसार दिपक परदेशी (शेवाळ) यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील दिपक परदेशी (शेवाळ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आखिल भारतीय मिना समाज  महासभा संघठन मजबूत करण्यासाठी यांचे अनुभव व  मार्गदर्शने जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावात शाखा सुरू करणार आहोत अशी माहिती नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष दिपक परदेशी यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद, डाॅ. किरोडी लाल मिना, प्रदेश युवक अध्यक्ष महाराष्ट्र विठ्ठलसिंग काकरवाल, राज्य संघटक दिपक डोभाळ, खांदेश विभाग प्रमुख रमेश जोनवाल, खान्देश विभाग सचिव सुभाष डोभाल, औरंगाबाद जिल्हा आध्यक्ष  भिमसिंग घुसिंगा आणि चाळिसगाव तालुका आध्यक्ष गोकुळ चेडवाळ आदींनी निवडीबद्दल अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. परदेशी यांच्या निवडीबद्दल सर्वञ समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.