अँपेरिक्षा अपघातात एक ठार; तीन जखमी

0

फैजपुर :- यावल फैजपूर रस्त्यावर हंबर्डी गावाजवळ अँपेरिक्षासमोर अचानक एक लहान मुलगा आला त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अँपेरिक्षा उलटून एकाचा जागेवर मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. ही घटना दि.७रोजी हंबर्डी रेणुका माता मंदिरा जवळील घडली.

याबाबत  मिळालेली माहीती अशी की, लहान वाघोदे खु. ता. रावेर येथील कोळी कुटुंबिय अँपेरिक्षा क्रमांक,एम्.एच.१९ बी.यु.१५८१ या रिक्षात बसून यावल तालुक्यातील सतोद कोळवद येथे साखर पुड्यास जात होते. रस्त्याने हंबर्डी गावच्या रेणुका माता मंदिरा समोरुन अचानक एक लहान मुलगा रस्त्यावर आला त्याला वाचविण्यासाठी अँपेरिक्षा चालकाने अर्जन्ट ब्रेक मारल्याने रिक्षा कडेला उलटली. त्यात भावी नवरदेवाचा काका राकेश रमेश कोळी (वय 48) रा.लहान वाघोदे खु. ता.रावेर हा जागीच ठार झाला. तर साखर पुड्यात जाणारा भावी नवरदे आकाश सह तीन किरकोळ जखमी झाले. किरकोळ जख्मीना फैजपुर येथील आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याबाबत फैजपुर पोलिस स्टेशनला घटानेची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.