Monday, September 26, 2022

९० वर्षीय वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पिंप्राळा हुडको या भागात राहणारे ९० वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शिवराम शंकर सोनवणे (वय ९०, रा. पिंप्राळा हुडको) असे मयत वृध्दाचे नाव आहे.  शिवराम सोनवणे हे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते विधवा सुन व नातवंडे यांच्यासह राहतात. त्यांच्या मुलाचे दोन वर्षांपुर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. त्यांची सुनबाई माहेरी आईवडीलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.

काल गुरूवार २३ सप्टेंबर रोजी घरी कुणीही नसतांना त्यांनी बाथरूमच्या कडीकोयंडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ७ वाजता उघडकीला आली. सायंकाळी सुनबाई घरात आल्यावर हा प्रकार लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील, महेश पवार करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या