Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार ‘राम’ भरोसे!
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»८०० रुपयांची लाच भोवली ; वाहतूक पाोलिसासह पंटरला सक्तमजुरीची शिक्षा
    गुन्हे वार्ता

    ८०० रुपयांची लाच भोवली ; वाहतूक पाोलिसासह पंटरला सक्तमजुरीची शिक्षा

    By June 29, 2020No Comments182 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी) । खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याच्या मोबदल्यात ८०० रूपये घेणारा पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (वय-44) याच्यासह पंटर मोहन भिका गुजर (वय-54) या दोघांना चार वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.

    तक्रारदार हे चाळीसगावातील कॅप्टन कॉर्नर येथून मारोती ओमनी वाहतनात प्रवासी भरत असतांना पोलीस नाईक आबासाहेब पाटील व पंटर मोहन गुजर यांनी चाळीसगाव येथून प्रवासी वाहतूक करायची असेल तर मागील महिन्याचे व चालू महिन्याचे असे एकुण ८०० रूपयांची मागणी केली होती. याप्रकरणी ३१ मार्च २०१६ रोजी ॲन्टी करप्शन ब्यूरो विभागाला तक्रारदाराने तक्रार केली. चौकशी होवून आबा पाटील आणि मोहन गुजर या दोन्ही संशयितांना रंगेहात पकडले. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपासाधिकारी यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे सहाय्यक वकील भारती खडसे यांनी एकुण ४ साक्षिदार तपासले.

    जिल्हा न्यायाधिश पी.वाय.लाडेकर यांनी लाच मागणी केल्याप्रकरणी आरोपी पोलीस नाईक आबा पाटील यास तीन वर्ष सक्तमजूरी व लाच स्वीकारल्याप्रकरणी ४ वर्षे सक्त मजुरी व दोन्ही कामात प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली तर सहकारी आरोपी मोहन गुजर याला तीन वर्षाची सक्त मजूरी व हजार रूपये दंड ठोठावला. त्यात तक्रारदार, पंच, सक्षम अधिकारी, तत्कालीन पोलीस अधिक्षक व पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. त्याकामी पैरवी अधिकारी अनिल सपकाळे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनिल शिरसाठ यांनी सहकार्य घेतले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार ‘राम’ भरोसे!

    November 6, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif