Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»६ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये तीन जागा बिनविरोध
    जळगाव

    ६ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये तीन जागा बिनविरोध

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ६ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये तीन जागा बिनविरोध

    नऊ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात ; २० डिसेंबरला मतदान, २१ ला निकाल

    जळगाव (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या स्थगित झालेल्या निवडणुकांच्या प्रक्रियेला आज नव्या गतीने सुरुवात झाली असून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर एकूण तीन जागा बिनविरोध ठरल्या आहेत. सावदा नगरपरिषदेत दोन तर भुसावळ नगरपरिषदेत एक जागा अनस्पर्धित राहिली आहे. उर्वरित नऊ जागांसाठी तब्बल ३७ उमेदवार रिंगणात कायम राहिल्याने या ठिकाणी चुरस अधिक तीव्र होणार आहे.

    माघारीनंतरचे चित्र  ; ३ जागा बिनविरोध

    माघारीच्या अखेरच्या तारखेनंतर सावदा येथील दोन आणि भुसावळ येथील एक अशी एकूण तीन जागांवर सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया थेट संपुष्टात आली आहे. नऊ जागांसाठी प्रत्येकी अनेक उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा चुरशीची होणार असून मतदारांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.

    मतदान व मतमोजणी

    २० डिसेंबर : उर्वरित नऊ जागांसाठी मतदान

    २१ डिसेंबर : मतमोजणी तसेच आधी स्थगित केलेल्या प्रभागांची मतमोजणी

    पूर्वनियोजित २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ४५२ प्रभागांमध्ये मतदान झाले होते. त्यांची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती; परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे ती स्थगित करून आता २१ डिसेंबरला नव्या मतमोजणीसोबत घेण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालावर केंद्रीत झाले आहे.

    जिल्ह्यातील प्रभागनिहाय उमेदवार 

    अमळनेर प्रभाग 1 अ – 3 उमेदवार , सावदा , प्रभाग 2 ब – 1 उमेदवार (बिनविरोध) , प्रभाग 4 ब – 2 उमेदवार,प्रभाग 10 ब – 1 उमेदवार (बिनविरोध) ,यावल प्रभाग 8 ब – 2 उमेदवार, वरणगाव प्रभाग 10 अ – 7 उमेदवार ,प्रभाग 10 क – 4 उमेदवार , पाचोरा प्रभाग 11 अ – 2 उमेदवार , प्रभाग 12 ब – 3 उमेदवार , भुसावळ प्रभाग 4 ब – 10 उमेदवार , प्रभाग 5 ब – 1 उमेदवार (बिनविरोध) , प्रभाग 11 ब – 4 उमेदवार

    jalgaon nagarpalika election
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif