वरणगाव – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव हुशार व्यक्ती होते. ६४ विषयांचा गाढे अभ्यासक असणारे हे जगातील एकमेव व्यक्ती होते . असे प्रतिपादन डॉ . देवानंद उबाळे यांनी सम्राटनगर येथील महात्मा फुले छत्रपती शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ व आजचे वास्तव आयोजित व्याख्यानात बोलत होते.
यावेळी पीएसआय निलेश वाघ, नगराध्यक्ष सुनिल काळे, नगरसेवीका सौ मालाताई मेढे, डॉ देवानंद उबाळे, कामगार नेते मिलींद मेढे, संतोष वानखेडे आदीच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द , डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . तसेच बौध्दाचार्य विजय बोदडे यांनी बुध्द वंदना घेण्यात आली . महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सम्राटनगरात लिंबू चमचा , संगीत खूर्ची स्त्री पुरुष लहान गट मोठा गट , माहिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विजयी झालेल्याना बक्षिस देण्यात आले.
डॉ उबाळे म्हणाले की , डॉ बाबासाहेब आंबेडकरानी पत्रकारीतेपासून जीवनाची सुरूवात करुन ते जगातील उत्कृष्ठ असे संविधान निर्माते बनले या संविधानाचा जगभर अभ्यास केला जात आहे.पीएसआय निलेश वाघ यांनी तरुण मुलांनी स्पर्धा परिक्षेकडे वळावे असे सांगीतले . या प्रसंगी कुमारी सुप्रीया वानखेडे १० वर्षीय मुलीने सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावरील एकपात्री एकांकिका सादर केली .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल निकम , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे , गजानन मोरे , शुक्लोधन बोदडे , विशाल सुरवाडे , अनिल बावस्कर , साहिल सुरवाडे , प्रतिक महाले , अभय सुरवाडे , रवि तायडे , हर्षल तायडे , सूरज सुरवाडे , किरण सुरवाडे , आकाश बोदडे , संदिप सुरवाडे , रतन मोरे , सुनिल महाले , मोहन सोनवणे , मुकूंदा धंनधरे , विशाल निकम , योगेश मोरे , भूषण सुरवाडे , शैलेंद्र सुरवाडे , दिपक मोरे , पिंटू मोरे , प्रभाकर बोदडे , सुनिता बावस्कर , मंगला सुरवाडे , प्रतिभा महाले , वर्षा सुरवाडे , निकम मावशी , मोरे मावशी , सुरवाडे मावशी , आदीनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोदडे यांनी केले तर आभार अनिल बावस्कर यांनी मानले .