५४ प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली !

1

भोपाळ – ५४ प्रवाशांनी भरलेली बस मध्यप्रदेशातील कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आले. दरम्यान सात प्रवाशांना वाचवण्यात आले असून इतरांचा शोध घेतला जात आहे. सतनाच्या दिशेने बस जात असताना हा अपघात झाला.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला. बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ३० फूट खोल कालवा असल्यामुळे पूर्ण बसच त्यात बुडाली आहे.

 

क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्य़ांशी चर्चा केली आहे.

1 Comment
  1. CBD gummies for sale says

    WOW just what I was searching for. Came here by searching for
    CBD gummies for sale

Leave A Reply

Your email address will not be published.