३ लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील मारूळ येथील विवाहितेला नोकरी लावण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणण्यासाठी  मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काजल निलभूषण मेढे (वय २०) यांचा विवाह यावल तालुक्यातील मारुळ येथील नीलभूषण पांडुरंग मेढे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान पती निलभूषण मेढे याने लग्नात मान सन्मान केला नाही आणि नोकरी लावण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे. यासाठी विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

त्यानंतर सासू, दीर व दोन नणंद यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता काजल मेढे या माहेरी निघून आल्या.

यासंदर्भात सोमवार १३ डिसेंबर रोजी दुपारी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती  निलभूषण मेढे, सासू लक्ष्मी पांडूरंग मेढे, दीर निलंबर पांडूरंग मेढ, नणंद सावित्री राहूल नराळे, दीर सत्यम पांडूरंग मेढे आणि नणंद भाग्यश्री सुरेश वाघ सर्व रा. मारूळ ता. यावल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ विकास कोल्हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.