जळगाव : जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ऑडिटची छाननी करण्यासाठी ३२ हजाराची लाच घेताना जिल्हा विशेष लेखा परीक्षकास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रशासकिय इमारतीत बुधवारी रात्री १० वाजता रंगेहाथ पकडलं आहे. रावसाहेब बाजीराव जंगले (४३, रा. जळगाव) असे या लेखा परीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात तक्रारदार जळगाव शहरातील असून त्यांनी तसेच इतर सहकारी यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांचे ऑडिट पूर्ण करुन ते छाननीसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ रावसाहेब जंगले यांच्याकडे सादर केले होते. जंगले यांनी या कामासाठी ३१ जुलै रोजी ५२ हजाराची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर नाशिकचे निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, म्रुदुला नाईक, हवालदार दीपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बाविस्कर व दाभोळे यांच्या पथकाने बुधवारी रात्री १० वाजता सापळा रचून ही कारवाई केली.