Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»२७ फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी भाजपची ३० हजार पानी याचिका
    जळगाव

    २७ फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी भाजपची ३० हजार पानी याचिका

    By March 31, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून शिवसेनेला मतदान करणाऱ्या २७ फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी भाजपनं नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी तब्बल ३० हजार पानांची याचिका दाखल केली आहे. यावेळी नाशिक महापालिकेचे गटनेते जगदीश पाटील व अॅड. संदीप भगत आदी उपस्थित होते.

    महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडली होती. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे याकरता जळगाव मनपा भाजप गटनेता भगत बालानी यांनी आज बुधवारी दुपारी १ वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली.

    भाजपमधून फुटलेल्या या २७ नगरसेवकांना भाजपने प्रत्यक्ष, मोबाईल, व्हॉट्सअॅप, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा प्रकारे पक्षादेश बजावला होता. मात्र, त्याचे उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप आहे. विशेष म्हणजे भाजपने महासभेचे इतिवृत्त, सीडी, महत्वाची कागदपत्रे, व्हीप बजावल्याचे पुरावे असे सर्व एकूण तब्बल ३० हजार पाने असलेली याचिका दाखल केली असल्याची माहिती भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी दिली आहे.

    दरम्यान, महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान ऑनलाइन महासभेत नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यतिरिक्त इतर जण सहभागी झाल्यामुळे ही महासभा बेकायदेशीर असल्याबाबत देखील भाजपकडून न्यायालयात स्वंत्रत याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही भगत बालाणी यांनी दिली आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif