यावल (प्रतिनीधी) : २६/११ च्या मुंबई येथील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान स्व. मुरलीधर लक्ष्मण चौधरी . हे मुळ हिंगोणा गावचे रहीवासी असुन त्यांच्या मुंबई येथे कार्यरत असतांना २६/११च्या दहशदवादी हल्यात प्रथम गोळी लागून वीर मरण आले होते.
अशा देशा साठी आपले बलीदान देणाऱ्या जवानाला एकही राजकीय पदधिकारी कींवा लोकप्रतिनिधीनी त्यांच्या मुळ गाव हिंगोणा येथे शहीद स्मारकावर भेट देऊन श्रध्दांजली अर्पण केली नाही. स्व मुरलीधर चौधरी . यांच्या हिंगोणा या गावात त्यांच्या हुतात्मा स्मारकावर . देशासाठी दहशदवाद्यांशी लढतांना विरमरण पावलेल्या शहीद स्मारकास श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तसेच कोणत्याही राजकीय पद अधिकाऱ्याने हिंगोणा येथे शहीद स्मारकावर का भेट दिली नाही? तसेच त्यांच्या अशा देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाला वेळ नाही होती कां? अशी उलट सुलट चर्चा हिंगोणा गावात रंगली होती.