२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील जवानांना अभिवादन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज २६-११रोजी मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यावेळी आपल्या जीवाची मुळीच परवा न करता हा हल्ला परतवून लावण्यात आला व एका दहशतवाद्यास जिवंत पकडले. दरम्यान या हल्ल्यात मुंबई, महाराष्ट्र पोलीस आणि भारतीय सैन्न्यातील जवान धारतीर्थ पडले होते.

या हल्ल्यातील शहिद जवानांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांच्या स्मरणार्थ आज पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक जळगाव चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक जळगाव कुमार चिंता यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, अंमलदार, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्पचक्र व फुले अर्पण करून मानवंदना दिली. त्याच बरोबर आज संविधान दिना निमित्ताने संविधान वाचन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here