२६ जणांचे नळ कनेक्शन कट; एक लाख नव्वद हजारांची वसुली

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनवेल ग्रामपंचायत मार्फत नळ कनेक्शनची  व घरपट्टी थकबाकी वसुली धडक मोहीम राबवुन एकाच दिवशी २६ जणांचे नळ कनेक्शन कट केले, तर वसुली मोहीम तीव्र करुन एक लाख नव्वद हजार रुपये वसूल करण्यात आले.

मनवेल ग्रामपंचायतची घरपट्टी व पाणीपुरवठाचे नळ कनेक्शन २८ लाख रुपये पर्यंत थकबाकी आहे. गावातील ज्या लोकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे अशा नागरिकांना अगोदर सुचना दिल्या व गावात दंवडी देऊन आवाहन करण्यात आले, यात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र जास्त थकबाकी असलेल्या नागरिकांचे  नळ कनेक्शन कट करण्यात आले.

यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी दहीगाव, शिरसाड, थोरगव्हाण, गिरडगाव व साकळी येथील ग्रामसेवक यांचे वसुली पथक तयार करुन ग्रामपंचायतची थकबाकी वसूली मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत सरपंच जयसिंग सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक भरत पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.