नवी दिल्ली : मागील २४ तासांमध्ये देशभरात १८ हजार १७७ नवे कोरोनाबाधित आढळले व २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजार ९२३ जण करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे.
देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहचली आहे. तर, सध्या देशात २ लाख ४७ हजार २२० अॅक्टिव्ह केसेस असून, ९९ लाख २७ हजार ३१० जण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय करोनामुळे देशात आजपर्यंत १ लाख ४९ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २ जानेवारीपर्यंत १७,४८,९९,७८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ९ लाख ५८ हजार १२५ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरकडून ही माहिती मिळालेली आहे.
केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे.