२४ तासांत देशात ६४ हजार ५५३ करोनाबाधित रुग्ण आढळले

0

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून वेगानं वाढत आहे. मागील २४ तासांत देशात ६४ हजार ५५३ करोनाबाधित रुग्ण आढळे तर १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 17 लाख 51 हजार 555 रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे 6 लाख 61 हजार 595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत देशात ४८ हजार ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५६,३८३ रुग्ण बरे झाले. हे प्रमाण ७०.७६ टक्क्यांवर पोहोचले आहेत. मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.